An important relationship in our life...


जीवाला जीव लावणार नातं...



प्रत्येकाचा आयुष्यातील एक असं नातं,जे आपल्याला खऱ्या अर्थाने जगायला शिकवत. ह्या संपूर्ण जगाला वेगळ्या दृष्टी ने बघायला शिकवत.
आज चा ह्या 21व्या शतकात सगळ्यांचे शेकडो मित्र असतील.पण जिवलग मित्र हे थोडेच असतात.जीवाला जीव लावणारे मित्र काही थोड्याच नशीबवान लोकांचा पदरी असतात.मस्ती करणारे मित्र ,गरजेचा वेळी मदतीला धावणारे मित्र,आपल्या मैत्रिणींशी setting लाऊन देणारे मित्र, वेळ पडल्यास भटकलेल्या मित्राला योग्य रस्ता दाखवणारे मित्र सर्वांना हवे असतात.


मित्र हेच एक अस नात आहे ज्याचाशी आपण निसंकोच आपले सर्व secrets share करतो.  आपल्या जीवनातील सुख दुःख सांगतो, मन मोकळे पणाने बोलतो. मग ते मित्र कुणाचे आईवडील असतील, कुणाचे भाऊ बहीण, तर कुणाची बायको किवा आजी आजोबा सुद्धा असतील.
त्यांच्याशी असणार आपलं मैत्रीचं नात हे महत्वाचं असतं.


मित्र हे नेहमी थोडे वेड असतात.
काही मित्र खोडकर,शांत असणारे , तर काही मस्ती मजाक करणारे व शिव्या देणारे वेडे मित्र सुद्धा असतात.पोहता येत नसले तरी तू मार उडी आम्ही आहोत असे म्हणणारे मित्र .ते पाण्यामध्ये मागून ढकलून देणारे मित्र. अशा ह्या वेड्या मित्रांमुळेच आयुष्य आनंदी आणि रंगमय होऊन जातं.
मित्रांशिवय हे जगणं अगदी बेचव असतं.



Jr.Patil

Author & Editor

Has laoreet percipitur ad. Vide interesset in mei, no his legimus verterem. Et nostrum imperdiet appellantur usu, mnesarchum referrentur id vim.

0 comments:

Post a Comment