मुंबई हे शहर सर्वांसाठी एक स्वप्न नगरी आहे. प्रत्येक जण मुंबई मध्ये नोकरी करायचं स्वप्न बघतो. देशातील अनेक राज्यांमधून हजारों लोक मुंबई मध्ये नोकरी करायचा हेतू ने येत असतात.तसेच बाहेरचा देशातून पण कित्येक लोक मुंबई मध्ये येऊन नोकरी करतात.मुंबई मध्ये नोकऱ्यांची कमी नाही. फक्त ती नोकरी मिळवण्याची क्षमता आणि धडपड आपल्या मध्ये असली पाहिजे. आपल्या महाराष्ट्र राज्याचा गावा गावामधून लोक येऊन मुंबई मध्ये नोकऱ्या, उद्योग धंदे आणि व्यापार करतात. काही शिक्षणासाठी तर काही क्रीडा स्पर्धांसाठी मुंबई मध्ये दाखल होतात. वर्षातून एकदा,दोन दा सणासुदीला गावी जाणारा सर्व सामान्य मुंबईकर आपलं गाव मात्र कधी विसरत नाही. कधी होळीला, गणपतीला तर कधी मे महिन्याचा सुट्टीत तो आवर्जून आपल्या गावी जातो. गावाशी असलेली त्याची ओढ त्याला आपल्या गावाकडे ओढत घेऊन जाते. गावाचा लहान मोठ्या कार्यात सहभागी होतो.
पण कोणत्याही कार्यक्रमात हवा असणारा मुंबईकर आज मात्र गावकऱ्याना अगदी नकोसा झाला आहे. लग्नासाठी मुलगी द्यायची असेल तर मुलगा मात्र मुंबई मध्ये नोकरी करणारा हवा ,मुंबईत त्याचं स्वतःच घर हवं असे म्हणणाऱ्या मुली आणि इतर गावाकडची लोक आज मुंबईकरांना बघून लांबूनच निघून जात आहेत. गावाचा इतर कामा मध्ये काम करायला आणि शुभ कार्यात देणग्या द्यायला मुंबईकर हवा असतो.पण आता त्याच मुंबईकर ला गावी येऊ नका असा सांगण्यात येतं. जरी तो गावी आला तरी वाळीत टाकल्या सारखी त्याला वागणूक दिली जाते. कोरोणा ह्या भयानक विषाणू ने लोकांना अगदी घाबरून सोडला आहे. त्यालाही माहित आहे त्याचा मुळे तुम्हाला त्रास होईल. पण तो तरी काय करणार आपलं गाव सोडून तो जाणार तरी कुठे...? अशा संकटकाळी गावचे नागरिक म्हणून तुमची ती जबाबदारी आहे, की तुम्ही मुंबई,पुण्यासारख्या शहरातून आलेल्या नागरिकाना योग्य वागणूक आणि राहण्यालायक सोई सुविधा उलब्ध करून द्याव्या.घाबरून न जाता त्यांना सहकार्य करावं.
ह्या कोरोना विषाणू चा भीती पोटी किती सारे मुंबईकर स्थलांतर करून आप आपल्या गावी परतले आहेत.अजून कित्येक मुंबईकर गावी जाण्यासाठी म्हणून बसले आहेत पण गावी गेल्यावर काय होईल,गावचे लोक घेतली की नाही आणि आमचा मुळे त्यांना कोरोना ची बाधा झाली तर ह्या भीतीने मुंबई मधेच बसून आहेत. मुंबई सारख्या शहरातील लोक कारोणाचा भीतीने घरात नुसते बसून आहेत. काम नाही आणि काम नाही तर पैसे नाहीत.तुम्हाला तर माहीतच आहे पैश्याशिवया ह्या युगात जगणं किती कठीण आहे, खरं तर मुंबईत जगणं किती कठीण आहे. हे lockdown चे दिवस आणि रात्र तो मुंबईकर कसे घालवत असेल हे आता त्याचा शिवाय चांगलं कुणाला माहिती असणार...? पण तो हार मानणार नाही. फक्त काहीच दिवसाचं संकट आहे नंतर सर्व मुंबई आपलीच आहे. परत जोमाने कष्ट करायचे आणि आनंदी राहायचं असा म्हणणारा तो एक खरा मुंबईकरच असेल.
त्यामुळे मुंबई सारख्या शहरातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मदत आणि सहकार्य करा. तो कुणी परका नसून आपल्याच गावातील एक नागरिक आहे, ह्याची जाण ठेवा.संपूर्ण जगावर आलेल्या कोरोना नावाचा विषानुशी लढायला त्याला तुमचा मदतीची गरज आहे. तो एक जबाबदार मुंबईकर आहे आणि त्या ही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे तो ह्या कणखर महाराष्ट्राचा मातीतला मावळा आहे. त्यामुळे सर्वांनी थोडी माणुसकी दाखवा.आणि मदतीचा हाथ पुढे करा.
धन्यवाद...🙏
0 comments:
Post a Comment