Maharashtrachi Sahyadri...


सह्याद्रीचा पाऊस....


महाराष्ट्रातील सह्याद्रीचा कडे , कपाऱ्यांमध्ये तास अन तास कोसळणारा तो मुसळधार पाऊस सगळ्यांनी अनुभवला असेल.आपल्या महाराष्ट्रात असा एक ही व्यक्ती नसेल ज्याने सह्याद्रीचा पाऊस अनुभवलं नसेल.संपूर्ण डोंगराळ भागावरती पसरलेली पांढरी शुभ्र धुक्याची चादर पाहताच क्षणी मनाला अलवार स्पर्श करून जाते.पावसाचा येणारा प्रत्येक थेंब आणि थेंब मन तृप्त करून जातो.  


मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने तयार झालेल्या धबधब्यामध्ये मनसोक्त भिजणे,
दिवस भर पावसामध्ये एका ठिकानाहून दुसऱ्या ठिकाणी फिरणे याची मज्जाच काही वेगळी असते.महाराजांचा पद स्पर्शाने पावन झालेल्या भव्य गढ किल्यांचे साैंदर्य डोळे दिपवून टाकणारे असते.


वरून कोसळणारा पाऊस,संपूर्ण गढावर पसरलेली हिरवीगार रानाची चादर आणि गढाला स्पर्श करून जाणारे ते ढग ,
तो अनुभव एखाद्या स्वर्गात आल्यासारखा असतो.
पावसामध्ये ऐकू येणारा त्या पक्षांचा किलबिलाट आणि जोर जोरात वाहणारे वारे पाहून प्रत्येक निसर्ग प्रेमी सह्याद्री कडे नेहमी आकर्षित होत असतात. पुराचा पाण्यामध्ये उडी मारून पोहणे असे धाडस ह्या सह्याद्रीचा मातीत होत असतात.


संध्याकाळ झाली की रात्र किड्यांची किरकिर चालू होते. रात्रीचा वेळीं मासे व खेकडी पकडन्याची मज्जाच काय वेगळी असते. पावसाने तुडुंब भरलेले नदी,नाले अगदी सुसाट वाहत सुटतात. असा हा आमचा महाराष्ट्रातील कणखर सह्याद्री जो तुम्ही कधी ही आणि कोणत्या ही ऋतू मध्ये पाहिला तरी अंगावर शहारे आल्या शिवाय राहणार नाही.


❤️सह्याद्री तू माय अमुची
राहतो तुझा उदरा पाशी🤗
🙏करतो आरती जगदंबेची
दैवत अमुचे शिव छत्रपती🚩


Jr.Patil

Author & Editor

Has laoreet percipitur ad. Vide interesset in mei, no his legimus verterem. Et nostrum imperdiet appellantur usu, mnesarchum referrentur id vim.

0 comments:

Post a Comment